Pune Crime News : नातलग असलेल्या बिजनेस पार्टनरने फसवले, एकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसीन्यूज : बिझनेस पार्टनर ने 14 लाखाचा हिशोब न देता फसवणूक केल्याच्या रागातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसरमधील मिरेकर वस्ती या ठिकाणी ही घटना घडली आहे.

शंकर हुगार (वय 45, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साडू शांतप्पा पुगार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी हुगार (वय 40, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि शांतप्पा साडू असून त्यांनी भागीदारीत महानगरपालिकेच्या ड्रेनज पाईपलाईनचे काम घेतले होते. त्यामध्ये जो नफा होईल तो दोघांमध्ये वाटून घेण्याचे निश्चीत करण्यात आले होते.

मात्र, शांतप्पाने ड्रेनज पाईपलाईन कॉन्ट्रक्टमध्ये झालेला नफा शंकरला दाखविला नाही. त्यामुळे शंकरने त्याला हिशेब मागितला असता, शांतप्पाने शिवीगाळ करुन मारहाण केली. कामाचे 14 लाख रुपये न दिल्याच्या ताणातून शंकरने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली.

हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी शांतप्पा याचा शोध सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.