Pune Crime News : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.

राजेश दगडू महाजन (वय 50) असे गळफास घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस शिपाई म्हणून ते काम करत होते. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, राजेश महाजन हे लष्करात होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी स्वीकारली होती. ते पुणे शहर पोलीस दलात दाखल होते. दरम्यान त्यांनी आज राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहेत. काही वेळापूर्वी हा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेतली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.