Pune Crime News : महागड्या गाड्यातून येवून घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज –  महागड्या गाड्यांमधून फिरत रेकी करायची व नंतर घरफोडी अशा (Pune Crime News) आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने चार जणांना अटक करत 1 कोटी 21 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद इरफान उर्फ उजाला रॉबीन हुड (रा. बिहार), सुनिल यादव, पुनित यादव, राजेश यादव (रा. गाझीयाबाद)

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे खिडकीच्या कोयंडा तोडून घरातील पिस्टल व जिवंत काडतूस सोने-चांदी, दोन लाख रुपये चोरीला गेले होते. यावरून पोलिसांनी तीन तपासी पथक पाठवले.सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून एक संशयीत जग्वार कारमध्ये फिरत होता.त्याची नंबर प्लेट ही बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यासाठी पोलिसांनी पुणे ते नाशिक पर्यंत 200 सिसिटीव्ही फुटेज कॅमेऱ्याची पडताळणी करून गुन्ह्यात वापरलेल्या कारचा खरा नंबर पोलिसांनी शोधला. यावेळी त्यांनी मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबीन हूड, सुनिल यादव पुनित यादव व राजेश यादव यांची ओळख पटली.

Chinchwad Bye Election :  भाजप आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

 

पोलिसांनी तातडीने तपासी पथके गाझीयाबादला पाठवली पोलिसांनी तब्बल आट दिवस आरोपींचा माग काढला. यातील रॉबीन हूड हा पंजाबला असल्याचे पोलिसांना समजले, आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हे पसार होत होते, पोलिसांनी परिसराचा अभ्यास करत वेशांतर करत सापळा रचून पोलिसांनी गुरुवारी (दि.23) पोलिसांनी आरोपींना अटक केली व त्यांच्याकडूल पिस्टल सोन्याचे दागिने, जग्वार कार, घड्याळ, ताब्यात घेतले.

आरोपी रॉबीन हूड हा साथिदारांच्या मदतीने मोठ्या शहरात जाऊन मोठ्या बंगल्यात  किंवा हाय प्रोफाईल वस्तीमध्ये चोरी करत होते. रॉबीन हूड विरोधात दिल्ली, गोवा, तमिळनाडू, उत्तरप्रदेश,(Pune Crime News) बिहार, पंजाब या राज्यात गँगस्टर अक्ट, आर्म अक्ट, घरफोडी असे 27 गंभीर गुन्हे दाखल होते. महाराष्ट्रातही चार गंभीर गुन्हा दाखल होते. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला 1 कोटी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.