Chinchwad Bye Election :  भाजप आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपचे माजी (Chinchwad Bye Election) नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली.

पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालय केंद्रात सकाळी हा प्रकार घडला. चिंचवडमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत होत आहे.

Chinchwad Bye Election :  सकाळच्या सत्रात मतदानाला अल्प प्रतिसाद, 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान

पिंपळेगुरव येथील सकाळी भाजपचे माजी नगरसेवक सांगर ( Chinchwad Bye Election) आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.