Pune Crime News : घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद, दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसीन्यूज : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे शहरात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांनी केलेले चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून तब्बल दहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय 18) आणि अमरसिंग जगतसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक घरफोडी झाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस याचा तपास करत असताना ही चोरी वरील आरोपीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी अजयसिंग दुधानी आणि पापासिंग दुधाने यांच्यासह गुन्हे केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडी आणी वाहनचोरीचे सहा गुन्हे उघड केले असून त्यांच्या ताब्यातून दोन कार, एक दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.