Pune Crime News : घोरपडे पेठेत सशस्त्र टोळक्याचा धुडगूस, सहा वाहनांची तोडफोड

एमपीसीन्यूज   घोरपडे पेठेत दशहत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन चारचाकीसह चार दुचाकी मिळून सहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना काल पहाटे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

केदार खंडागळे (वय 19, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदारचा भाऊ अपूर्व उर्फ मोन्या याचे काही दिवसांपूर्वी आरोपींशी वाद झाले होते. त्या वादाच्या रागातून आरोपींनी काल पहाटे कोयता हातात घेउन केदारला दमदाटी करीत धमकाविले.

त्याशिवाय परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या टोळक्याने कोयते, बांबू हवेत उंचावून ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका, नाहीतर एकएकाला कापून टाकू’ असे म्हणत दहशत निर्माण केली.

त्यानंतर परिसरातील दोन चारचाकी आणि चार दुचाकींची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.