Pune Crime News: शाळेचा स्वच्छतागृहात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ नराधमाला अखेर अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरातील मुलींच्या शाळेत भरदिवसा प्रवेश करून अकरा वर्षीय मुलीवर स्वच्छतागृहात बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली.

मंगेश तुकाराम पदुमले (वय 36) असे आरोपीचे नाव आहे. जनवाडी येथील एका दारूच्या गुत्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. शाळेजवळ असलेल्या एका शोरूममध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला जबरदस्तीने शाळेच्या स्वच्छतागृहात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते. यानंतर पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेत होती.

दरम्यान आरोपी हा शाळेजवळ असणाऱ्या एका शोरूम मध्ये एकच दिवस कामाला आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक माहिती काढतात जनवाडी येथील एका दारूच्या गुत्त्यावर त्याला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.