Pune Crime: विविध गुन्ह्यातील दोन सराईतांसह एका अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

पुणे गुन्हे शाखा एक ची कारवाई

एमपसी न्यूज : घरफोडी, वाहनचोरी व फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना व एका अल्पवयीन मुलाला पुणे गुन्हे शाखा एकने ताब्यात घेतले आहे. (Pune Crime) या कारवाईमध्ये आरोपीवरील 15 पेक्षा जास्त गुन्हे उघड आले आहेत.

 

अब्दुल्ला कादीर शेख (वय 36 रा.कोंढवा) व रोहीत दिपक सातपुते (वय 25 रा. हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने बक्कर कसाब मशिद यांचे हज यात्रेसाठी गोळा केलेले पैसे दुप्पट करुन देतो म्हणून घेतले मात्र ते परत केलेच नाहीत. (Pune Crime) पोलिसांनी त्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने कोंढव्यातू अटक केले. यावेळी त्याच्याकडून 19 हजार रुपये रोख व मोटारसायकल असा ऐवज जप्त केला. त्याला पुढील तपासासाठी गुन्हे शाखा एकच्या पथकाने समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

Weightlifting Competition Pune : वेटलिफ्टींग स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद; 122 खेळाडूंचा सहभाग

 

तर दुसऱ्या कारवाईमध्ये रोहित सातपुते हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. गुन्हे शाखा एकच्या पथकाला तो शिवाजी रोड येथे असल्याची खबर मिळाली त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी चतःश्रृंगी पोलीसांच्या ताब्यात दिले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील त्याच्यावरील 15 पेक्षा जास्त गुन्हे उघड झाले आहेत.

 

 

तसेच कात्रजच्या संतोषनगर भागातून दुचाकीची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही गुन्हे शाखा एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची अक्टीवा जप्त करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.