DFL India : आपल्या सैन्याला जाणून घेण्यासाठी खास ‘आझाद हिंद’ प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : भारताचा पहिला तिरंगा, भारताच्या आतापर्यंतच्या युद्धतील दिग्गजांची व्याख्याने, युद्धांवर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, सहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आझाद हिंद फौजमधील वीर योद्धे व त्यांचे कुटुंब असे खूप काही अनुभवण्यासाठी तीन दिवसीय आझाद हिंद प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  हे प्रदर्शन व परिषद 24 जुलै ते 26 जुलै दरम्यान ए. एस. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स, साईन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अहिल्याबाई होळकर चौक जवळ, पिंपरी येथे होणार आहे. डीएफएल (DFL India) ग्रुपचे संचालक राजेंद्र जाधव, निलेश सातपुते यांनी या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रदर्शन डीएफएल ग्रुप (DFL India) यांनी विविध माजी सैनिक संस्थानांच्या सहयोगाने आयोजित केले आहे. काँग्रेसच्या 1946 मधील मेरठ अधिवेशनात जो तिरंगा फडकवण्यात आला, तो अधिवेशनानंतर माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी गणपत राम नगर यांना दिला होता. तो तिरंगा प्रदर्शनात पाहता येईल. वॉक फॉर प्राईड यामध्ये भारतीय सेना, वायुसेना, नौसेनाचे माजी सैनिक हे रॅम्प वॉक करणार आहेत.

Weightlifting Competition Pune : वेटलिफ्टींग स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद; 122 खेळाडूंचा सहभाग

अखिल भारतीय आझाद हिंद फौज परिषद 24 जुलै रोजी होणार आहे. भारतीय तीनही सेनेतील महावीर चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र विजेते या परिषदेत येणार आहेत. त्यांचे कुटुंबिय देखील येणार आहेत.

आझाद हिंद फौज, आझाद हिंद सरकार, गदार चळवळ, क्रांतिकारक, भारतीय सशस्त्र सेनेचे विविध विंग्स, भारतीय सशस्त्र दलांच्या उल्लेखनीय लढाया – 1948, 1962, 1965, 1967, 1971, कारगिल, मेड इन इंडिया स्टार्ट अप उत्पादने व जागतिक रेकॉर्ड संग्रह हे प्रदर्शनाचे विषय आहेत. तसेच, ‘आपले सैन्य जाणून घ्या’ असे शस्त्र प्रदर्शन’ देखील होणार आहे. आपल्या सैन्याला जाणून घेण्याचा हा भव्य उपक्रम ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.