Pune Crime News : पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह, एका रात्रीत 10 वाहनांच्या काचा फोडून कारटेपसह साउंड सिस्टीम लंपास

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील नागरिकांचा आणि त्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. कारण कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकाच रात्रीतून तब्बल 10 वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि साउंड सिस्टीम चोरून नेले. विषेश म्हणजे घटना घडून दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांना चोरट्यांचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम 379 व 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गणंजय सोसायटीसमोर यातील तक्रारदार व्यक्तीने चार चाकी वाहन पार्क केले होते. सकाळी फिर्यादी गाडी जवळ गेल्यानंतर गाडीतील काचा फोडून इनबिल्ट असणारा कार टेप आणि सिस्टीम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच परिसरातील आणखी गाड्यांमधील कारटेप चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी एकच गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कारटेप चोरणारे हे चोरटे एकाच कारमधून आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चोरटे एका रात्री कोथरूड परिसरात बिनधास्त फिरत असताना रात्रगस्त घालणारे पोलीस नेमके होते कुठे ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.