Pune Crime News : सराईत गुंड सोहेल कनुल दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज -विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुंड ( Pune Crime News ) सोहेल सलीम कनुल (वय 20, संजय पार्क, एअरपोर्ट रोड विमान नगर) याला दोन वर्षासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सोहेल हा विमानतळ पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

सोहेल याने विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील विमान नगर कलवड आणि संजय पार्क भागात दहशत निर्माण केली होती. सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देऊन दहशतवादी कृत्य करणाऱ्या आरोपीमुळे लोकांच्या मनात कायदे विषयी संभ्रम निर्माण होऊ नये आणि सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा यासाठी त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात यावी असा अहवाल विमानतळ पोलिसांनी परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त न दिला होता.
विमानतळ पोलिसांच्या या अहवालावर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कडक कारवाई करत सोहेल याला दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.