Pune Crime News : नाव बदलून राहत होता कुख्यात दरोडेखोर, अडीच वर्षानंतर पोलिसांनी केले जेरबंद

0

एमपीसीन्यूज : एका दरोड्याच्या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांना पाहिजे असलेल्या कुख्यात दरोडेखोराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल अडीच वर्षानंतर जेरबंद केले.

माऊली बंट्या भोसले (वय 21) असे या दरोडेखोराचे नाव आहे. स्वतःचे नाव बदलून तो अहमदनगर जिल्ह्यात राहत होता.

दौंड तालुक्यातील बेटवाडी फाटा येथील एका प्लास्टिक उद्योजकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने एका टोळीने 1 लाख 17 हजाराची रोख रक्कम चोरून नेली होती.

4 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील चार जणांना अटकही झाली आहे.

यातील पाचवा आरोपी माऊली भोसले हा नाव बदलून नगर जिल्ह्यात राहता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

20 नोव्हेंबर रोजी तो दौंड शहरात येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. परंतु, त्याला या गोष्टीचा सुगावा लागल्याने त्याने पळ काढला होता. परंतु, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III