Pune Crime News: ई-मेल हॅक करून चोरलेले तीन लाख रुपये पुणे पोलिसांनी चीनमधील पोलिसांच्या मदतीने मिळवले परत

एमपीसी न्यूज – ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणाऱ्या मशीनची ऑर्डर देत असताना कंपनीचा ई-मेल हॅक करून 4 हजार 200 अमेरिकन डॉलरच्या झालेल्या फसवणूक प्रकरणातील रक्कम कंपनीला परत मिळवून देण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे व सायबर विभागाला यश आले आहे. पुणे पोलिसांनी चीनमधील कावलून पोलीस अधिका-यांशी संपर्क साधून ती रक्कम कंपनीला परत मिळवून दिली.

नासान मेडिकल इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. कंपनीने चीनमधील ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणाऱ्या कंपनीच्या मशीनची ऑर्डर दिली होती. मात्र, ऑर्डर देत असताना सायबर चोरट्यांनी कंपनीचा ई-मेल हॅक करून बँक खात्याची माहिती बदलली.

त्यानुसार कंपनीने 4 हजार 200 डॉलर (3 लाख 15 हजार रूपये) पाठविलेली रक्कम सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात वर्ग झाली. त्यानंतर कंपनीने सायबर विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सायबर विभागाने चीनमधील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून 4 हजार 200 अमेरिकन डॉलर कंपनीला परत मिळवून देण्यात यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.