-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : फर्ग्युसन महाविद्यालय आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : पुण्यातील प्रसिध्द फर्ग्युसन महाविद्यालयात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अँफी थिएटरसमोरच्या अंगणात असलेले एक चंदनाचे झाड अज्ञात चोरत्यांनी कापून चोरून नेले. गुरुवारी पहाटे तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी फर्ग्युसन महाविद्यालयातील पर्यवेक्षक अभिजित जाधव यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर समोरील पटांगणात चंदनाचे झाड होते. गुरुवारी पहाटे तीन ते सव्वातीनच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधून आलेल्या तीन व्यक्तींनी हे झाड कटरच्या सहाय्याने कापून त्याचा बुंधा चोरून नेला.

त्यानंतर चोरटे कॅनॉल रोडने ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेने पळून गेले.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.