Lonavala Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मर्गावर खालापूर टोलनाक्यावर तीन वाहनांचा भीषण अपघात

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मर्गावर मडप टनेलजवळ तीन वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. त्यात एका पाच वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. एक ट्रक यु टर्न घेत असताना हा अपघात झाला. त्यात एक गाडी पोलिस अधिका-याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

खालापूर येथील पुलाखाली मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात झाला. एक ट्रक, एक होंडा सिटी कार व स्विफ्ट डिझायर या तीन वाहनांत धडक झाली. यातील दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

स्विफ्ट डिझायर ही गाडी एक पोलिस अधिकारी चालवत होते. दुसऱ्या गाडीमध्ये एक कुटुंब होते. त्यात एक लहान मुलगा देखील होता. त्याचा मृत्यू झाला. तर चार-पाच जण जखमी असून त्यांना पनवेल येथील एमपीएम हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला असून पोलीस तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.