Pune News : वैद्यकीय महाविद्यालय सुरू पण, आदिवासी वसतिगृह बंदच; विद्यार्थ्यांची गैरसोय

एमपीसी न्यूज : – बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ससून रूग्णालय येथे शिकणा-या आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे बंद असल्याने गैरसोय होत आहे. 2 नोव्हेंबर 2020 पासून महाविद्यालय सुरू झाले. पण, वसतिगृह नसल्याने विद्यार्थ्यांना अनुपस्थित रहावे लागत आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाकडे वसतिगृह सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

गडचिरोली, नंदुरबार, नाशिक सारख्या दुर्गम भागातून विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येतात. महाविद्यालये सुरू झाली. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, डी. बी. टी. बंद असल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दुसरी लाट कमी झाल्याने महाविद्यालय 12 जुलै रोजी पुन्हा चालू होणार म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या लेटर पॅडवर 6 जुलै रोजी आदिवासी विकास विभागाला कळविले. परंतु, आदिवासी विकास विभागाने अद्याप वसतिगृह चालू केलेली नाहीत.

बी. जे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी महेंद्र भोये म्हणाला, ‘आदिवासी विकास विभागाला वेळोवेळी पाठपुरावा करूनही हे विकास विभाग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नक्की हे विकास विभाग आहे का अशा प्रश्न निर्माण होत आहे? त्यामुळे वैद्यकिय महाविद्यालयामध्ये शिक्षणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अनुपस्थित रहावे लागत आहे. नैराश्याची भावना निर्माण होते. मंत्री महोदयांनी वसतिगृह तात्काळ चालू करावे, अन्यथा विद्यार्थांना शिक्षण सोडण्याची परवानगी द्यावी.’

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share