Pune Crime News : पत्नीचे बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवले, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवत छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पती अभिजीत धावडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. पती अभिजित धावडे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. बदनामी करणारे व्हाट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवत असे. तसेच, सासऱ्यांनी तक्रारदारांना अश्लील बोलत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तर, इतरांनी अश्लील बोलून छळ करत माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे न आणल्यास नांदवणार नसल्याची धमकी दिली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.