Pune : कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गर्दी नियंत्रण आवश्यक -महापौर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनांसह गर्दी नियंत्रण आवश्यक असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तसेच, दाट लोकवस्ती, झोपडपट्टी आणि रेड झोन भागातील नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात मनपाने उपलब्ध करून दिलेल्या शाळा आणि अन्य ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पाटील इस्टेट, कामगार पुतळा, ताडीवाला रस्ता, लक्ष्मीनगर, येरवडा, परिसरातील पाहणी महापौरांनी केली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक आदित्य माळवे, सोनाली लांडगे, स्वाती लोखंडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे आदी उपस्थित होते.

संपूर्ण पाहणीप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनद्र प्रतापसिंग, भूजल विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, तसेच सहमनपा आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विजय दहीभाते, उपायुक्त अविनाश सकपाळ, नितीन उदास, किशोरी शिंदे, ताडीवाला रस्ता येथील पाहणी प्रसंगी क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे, सहपोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहाययक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

लक्ष्मीनगर, येरवडा येथील पाहणीप्रसंगी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार, डॉ. वैशाली जाधव, क्षेत्रीय अधिकारी विजय लांडगे, तसेच सहपोलिस आयुक्त सुनील फुलारी, वाहतूक उपायुक्त पंकज देशमुखव अन्य मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे डॉ. विवेक राजपूत व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

झोपडपट्टी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह दुर्गंधीमुक्त ठेवण्याबरोबरच सातत्याने स्वछ रहातील त्यादृष्टीने नियोजन केले जावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्वरित नियोजन करावे. घराजवळच्या केंद्रात पाठविण्याची त्यांची व्यवस्था करण्यात यावी. स्वाब तपासणी, त्यानंतर, अहवाल आल्यानंतर त्वरित नियोजन करण्यात यावे, अशा अनेक सूचनाही महापौरांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.