_MPC_DIR_MPU_III

Pune – पूर्ववैंमन्यसातून तरूणाची चाकू आणि कोयत्याने वार करून क्रूरपणे हत्या.

एमपीसी न्यूज – भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या तरूणाची 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग ठेऊन क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना काल गुरूवारी (दि.6) रात्री सव्वादहाच्या सुमारास आंबेगाव पठार येथील नक्षत्र बिल्डीगच्या गेटसमोर घडली.

_MPC_DIR_MPU_IV

विनायक मारुती पवार (वय २३ रा. शनीनगर कात्रज ) असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी गणेश मारुती शिर्के (वय 27 रा.  तळजाई वसाहत वनशिव वस्ती रोड पदमावती) यांनी फिर्याद दिली आहे.गणेश गायकवाड,  विशाल कांबळे, प्रकाश रेणुसे, बाळा शेडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे ( रा.चव्हाणनगर,शंकर महाराज वसाहत, धनकवडी) अशी यातील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यापूर्वी यातील आरोपी गणेश गायकवाड याचे संदिप गेजगे याच्यासोबत भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी फिर्यादी यांचा मामेभाऊ विनायक यांनी  गणेश गायकवाड याला फोन करून बोलावून घेतले.  त्यानंतर आंबेगाव पठार येथील नक्षत्र बिल्डीगच्या गेटसमोर विनायक आपल्या मित्रांसोबत गणेशची वाट पाहत थांबले. दरम्यान तिथे गणेश आणि त्याचे आणखी चार साथीदार  आले. ते आल्यानंतर 2 वर्षांपूर्वी चव्हाणनगर शंकर महाराज वसाहत येथे विनायक आणि विशाल कांबळे आणि प्रकाश रेनुसे यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी विनायकवर चाकू आणि कोयत्याने वार केले. एवढेच नाही तर फुटलेल्या जात्याच्या दगडाने विनायकच्या पाठीवर  दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केली.

याप्रकरणी गणेश आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.