Pimpri : शाळा,संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शाळा, संघटना यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील पी .के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 63वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने झाली. डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन जगन्नाथ काटे ( संचालक ) यांनी केले. त्यानंतर शिक्षक आणि   विद्यार्थ्यांनी  त्याच्यांबद्दल आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांवर आधारीत काही गाणी सादर केली .या कार्यक्रमामध्ये  संचालक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षका सविता  अंबेकर, संगीता पराळे, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी अत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल पाटील यांनी केले .

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सुंदर कांबळे, बबन शिरसाठ, शोभा शेट्टी, मनोहर वाघमारे, संतोष रणसिंग, नवनाथ डेंगळे, कलिंदर शेख,सलमान शेख, सायराबानू शेख, शबाना कुरेशी, शितल कोतवाल, निर्मला कुसाळकर आदी उपस्थित होते.

सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमही घेण्यात आले.

शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घटनाक्रम सांगितला. मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रतिकुल परिस्थिती असताना डॉ. आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अर्थशास्त्रात पदवी मिळवून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. शिक्षिका विशाखा भगत यांनी सांगितले, की जगातील सर्वात मोठ्या लोकशाही संविधानाचे लेखन करून समाजातील तळागाळातील लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, शील, करुणा ही तत्वे दिली. मूलभूत अधिकार दिले. समाजातील अस्पृश्यता निवारणासाठी आंदोलने केली. डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेताना अभ्यासाचा ध्यास घेऊन जीवनातील ध्येय गाठले,त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही विशाखा भगत यांनी केले.

यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे-पाटील, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, विशाखा भगत, भटू शिंदे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संरक्षण संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने पुणे जिल्हा कार्यालयात महापरिनिर्वाण  दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघटनेचे  राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा खजिनदार ओमकार शेरे, पुणे जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण दवणे, संघटक मुनिर शेख, सुर्यकांत दवणे, संतोष शेटे  आदींच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

 

 

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.