Pune : दिग्गजांच्या कलाविष्काराने सजणार ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव

एमपीसी न्यूज –  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग(Pune) तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. 9 ते 13 एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावर्षी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची (Pune)संधी पुणेकरांना मिळणार असून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, मंडळाचे पदाधिकारी तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय संगीत, लोकगीते, भारुड, पोवाडे, चित्रपट गीते, नाट्य गायनासह गीतरामायण, लाईव्ह ईन कॉन्सर्ट, शिवकल्याण राजा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

 

संगीत महोत्सवाचा प्रारंभ मंगळवार, दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रख्यात कलाकार महेश काळे यांचा महेश काळे लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाने होणार आहे. त्यापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर ,4 नवीन उमेदवारांची नावे समाविष्ट

संगीत महोत्सवात बुधवार, दि. 10 एप्रिल रोजी गणेश चंदनशिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी संगीत महोत्सवात प्रथमच गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह ईन कॉन्सर्ट कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचा समारोप पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमाने होणार असून यामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे देखील सहभागी होणार आहेत.

रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.