LokSabha Elections 2024 : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी-अजय मोरे

एमपीसी न्यूज – निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (LokSabha Elections 2024) निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत आंबेगाव तहसील कार्यालयात आयोजित क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी,  क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा  तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते.

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर ,4 नवीन उमेदवारांची नावे समाविष्ट

अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे म्हणाले, लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष रहावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. निवडणूक विषयक (LokSabha Elections 2024) कामकाजाचे प्रशिक्षणाचे योग्यरितीने आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रीयेसंबंधी सूक्ष्म बाबींचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला निवडणूक शाखा नायब  तहसीलदार सचिन वाघ,  अवसरी (खुर्द)  तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. बांदल, सतीश कांबळे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*स्ट्राँग रुम परिसराची पाहणी* 
निवडणूक निर्णय अधिकार.मोरे यांनी बैठकीनंतर अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रस्तावित स्ट्राँग रुम परिसराला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. यावेळी अवसरी खुर्द येथील काही मतदान केंद्रांनाही त्यांनी भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.

*गोहे बु. येथे मतदान जनजागृती*
आंबेगाव तालुक्यातील पाडळवाडी गोहे बुद्रुक येथे मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना मतदान  (LokSabha Elections 2024) प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली व मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.  नागरिकांकडून मतदान करण्याविषयी संकल्प पत्र  भरून घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.