Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर ,4 नवीन उमेदवारांची नावे समाविष्ट

एमपीसी न्यूज – आज ( दिनांक 3 एप्रिल) रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी  शिवसेना (उबाठा) गटाने  उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये ४ नावांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) गटाने  17 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामध्ये अजून ४ जणांचा समावेश होऊन आता शिवसेना (उबाठा) गटाचे एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत.

Loksabha Election 2024 : विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

याबाबतची अशी माहिती आहे की, उद्धव ठाकरे  यांनी आज  घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार उमेदवारांची (Loksabha election 2024) नावे जाहीर केली. यामध्ये सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर , हातकणंगलेमधून  सत्यजित पाटील आणि  पालघरमधून  भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नुकतेच  भाजपमधून  शिवसेना (उद्धव ठाकरे) गटामध्ये प्रवेश केलेले उन्मेष पाटील  यांचे सहकारी करण पवार यांना जळगाव मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.