Loksabha Election 2024 : विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

एमपीसी न्यूज – विवाहाची मिरवणूक निघालेली…फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले…सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत… आणि  लग्नघटिका     समिप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले.  तसेच त्यांनी इतरांनाही मतदान (Loksabha Election 2024) करण्याचे आवाहन केले.

विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरा मोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा निश्चय करतानाच देशाविषयीचे कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करुन नवविवाहीत जोडप्याने  संकल्प करुन एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला.

आंबगेाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची तयारी सुरू कसताना नवरदेवाची स्वारीही आली. अशात स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान (Loksabha Election 2024 ) जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वऱ्हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला  प्रचंड प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

Pimpri : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन केला 100 टक्के मतदानाचा निर्धार

शिरुर लोकसभा  मतदारसंघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथक मतदार संघात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करत आहे. जवळे गावात विवाहाच्या मिरवणुकीत मतदार जनजागृती करून वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळींना मतदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्वांनी मतदान संकल्पपत्र भरू दिले.  या उपक्रमात स्वीप सदस्य नारायण गोरे, तुषार शिंदे, सुनिल  भेके, सचिन तोडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

उत्कर्षा घोडेकर (वधू) म्हणाली, “जवळे गावात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरिक आणि आंबेगाव तालुक्यातील सजग मतदार म्हणून  मतदान करेल आणि आपल्या भागातील नागरिकांनीही मतदानात  उस्फूर्तपणे सहभागी व्हावे .

अक्षय लोखंडे (वर) म्हणाला, ” संसाराच्या  कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे आणि मतदान करणार आहे”.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना(एकनाथ शिंदे गट) मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.