Bhosari : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दमदाटी केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – कामानिमित्त पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने (Bhosari) दमदाटी केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे व राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, प्रदीप नाईक हे 28 मार्च रोजी दुपारी (Bhosari) सीमा बाळू शिंदे या महिलेच्या कामानिमित्त भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. ते केबिनच्या बाहेर थांबले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे हे केबिनमधून बाहेर आले. त्यांनी नाईक यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना तेथून जाण्यास सांगितले.

Hinjawadi : स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलेस अटक

इथे मी बोलेल तेच होणार, असे म्हणत तू इथून जा नाहीतर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान 21 मार्च रोजी सीमा शिंदे यांच्या कामानिमित्त पोलीस ठाण्यात गेल्यानंतर देखील फटांगरे यांनी अर्वाच्य भाषा वापरली असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.

फटांगरे यांनी वर्दीचा गैरवापर केला असून त्यांची चौकशी करावी. अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. यासंदर्भात नाईक यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे देखील लेखी तक्रार केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.