Pune : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ‘होम क्वारंटाईन’ ; ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह

Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar 'Home Quarantine'; Driver Corona Positive

एमपीसी न्यूज – पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ‘होम क्वारांटाईन’ झाले आहेत. कारण त्यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांचीही कोरोना टेस्ट होणार आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. डॉ. म्हैसेकर हे सध्या मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. शासनाच्या विविध बैठकांना उपस्थित राहून रोज आढावा घेत असतात. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने ते आता घरातूनच काम करणार असल्याची माहिती देण्यात आली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन म्हैसेकर आढावा घेत असतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ड्रायव्हरची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यामुळे आता पुणे विभागीय आयुक्तांनी घरातूनच काम सुरू केले आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वच अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहे. या 10 दिवसांच्या लॉकडाऊन काळात कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा आणखी सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुणे शहरात सध्या कोरोनाचे 28 हजारांच्यावर रुग्ण आहेत. तर, 18 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.