Chakan : सराईत गुन्हेगाराला अटक; दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त

criminal arrested; Two pistols and four live cartridges seized;चाकण गुन्हे शोध पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला चाकण गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.13) नाणेकरवाडी (ता. खेड) येथे करण्यात आली.

अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (वय.24, रा. नाणेकरवाडी, ता.खेड, जि. पुणे), असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराईत गुन्हेगार अक्षय याला गुप्त माहितीच्या आधारे नाणेकरवाडी येथील ठाकरवस्ती जवळील त्रिफुलीवर सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस सापडली.

तसेच त्याच्या घरातून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. हा सर्व शस्त्रसाठा पोलीसांनी जप्त केला आहे.

अक्षय पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. एवढेच नव्हे तर याचवर्षी फेब्रुवारीमध्ये सुध्दा चाकण व खेड पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस तसेच गुन्हे शोध पथकाचे विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, राजू जाधव, संजय जटे, हनुमंत कांबळे, विरसेन गायकवाड, संदिप सोनवणे, अनिल गोरड, निखल वर्षे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली.

गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.