Pimpri: लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी 557 रुग्णांची नोंद; 281 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

557 patient records on the first day of the lockdown; 281 discharged, 11 dead

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आज (मंगळवारी) लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी शहराच्या विविध भागातील 535 आणि  शहराबाहेरील 22 अशा 557  जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 281  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 8 हजार पार झाली आहे. आजपर्यंतची रुग्णसंख्या  8171 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. थेरगावातील 30 वर्षीय महिला, इंद्रायणीनगरमधील 69 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 64 वर्षीय पुरुष, चिखलीतील 65 वर्षीय महिला, चिंचवडमधील 42 वर्षीय पुरुष, मोशीतील 53 वर्षीय महिला, नेहरुनगर येथील 50 वर्षीय पुरुष, तळवडेतील 57 वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील 48 वर्षीय पुरुष आणि तळेगाव रोड येथील 58 वर्षीय पुरुष, पुण्यातील 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत  8171जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 4879 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 129 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 129 अशा 173 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या  1942 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 2204

# पॉझिटीव्ह रुग्ण – 557

#निगेटीव्ह रुग्ण – 1626

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1856

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1942

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 2077

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 8171

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1942

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 173

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 4879

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 20774

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 24, 40,188

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.