Pune: ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी मनोज नरवणे होणार देशाचे लष्करप्रमुख

एमपीसी न्यूज – पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीने आतापर्यंत अनेक नेते, संशोधक, विद्वान, साहित्यिक समाजाला दिले. याच मांदियाळीत आणखी भर पडली असून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे आता भारतीय लष्कराचे नवे प्रमुख म्हणून लवकरच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने आदी सन्मान मिळविलेले मनोज नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या नंतरचे नरवणे हे सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत. बिपिन रावत 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्याने मनोज नरवणे यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली.

आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ नरवणे यांनी शीख लाईट इन्फन्ट्रीच्या 7 व्या बटालियनमधून केली. लष्करी परंपरेचे पाईक असलेल्या नरवणे कुटुंबीयांतील मनोज नरवणे यांचे वडील, मुकुंद नरवणे हेही हवाईदलात अधिकारी होते. उत्कृष्ट लष्करी कामगिरीबरोबरच शांतता काळातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

मनोज नरवणे हे भारतीय लष्कराचे 28 वे प्रमुख असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.