Pune : पोलिसांच्या मध्यस्थीमुळे घरगुती वाद मिटला

एमपीसी न्यूज- दोघी बहिणींची लग्न एकाच घरात झाल्यामुळे सख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्या. एकत्र नांदत असताना एके दिवशी अचानक मोठ्या बहिणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी दोघी बहिणींना तीन आणि सात महिन्याच्या बाळासह घराबाहेर काढले. दोघी बहिणींनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी दोघीनाही घरी नेले. हवेली तालुक्यातील कोपरेगाव येथील ही घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 आणि 20 वर्षीय असलेल्या या बहिणी सख्या जावा आहेत.एकाच घरात त्यांची लग्न झाली आहेत. सर्व काही सुरळीत असताना अचानक मोठ्या बहिणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी दोघी बहिणीना त्यांच्या बाळासह घराबाहेर काढले. त्यानंतर या बहिणींनी उत्तमनगर पोलिसात धाव घेतली.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन या विवहितेचा पती, सासू, आणि घरातील इतरांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि मध्यस्थी करत सर्वांची समजूत घातली. त्यानंतर सासरची मंडळी दोघी बहिणींना घरी घेऊन गेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.