Pune : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे- जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.5 ऑगस्ट) सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

 

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

  • पुणे जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि. 5) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळवार (दि. 6) पर्यंत गोवा व महाराष्ट्रात प्रादेशिक हवामान केंदाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे जिह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर तालुक्यांमध्ये शनिवार (दि. 3) पासून अतिवृष्टी होत आहे.
  • अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शालेय विद्यार्थ्यांना या अतिवृष्टीचा परिणाम होऊ नये यासाठी सोमवारी (दि. 5) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.