Pimpri : पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; पिंपरी-चिंचवड शहरात पाणीच पाणी

एमपीसी न्यूज – पवना धरण पूर्णतः भरले असून धरणातून पवना नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. पवना धरणातून रविवारी (दि. 4) दुपारी बारा नंतर 18 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. जनजीवन विस्कळीत होत असून विविध पातळ्यांवर पर्यटन केले जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), अग्निशमन विभाग, पोलीस आणि इतर संस्थांच्या मदतीने बचावकार्य केले जात आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहारत पाणीच पाणी काही ठळक मुद्दे –
# शनिवारी (दि. 3) रात्री पवना धरण 100 टक्के भरले
# पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी धरणाचे सहाही दरवाजे एक फुटांवरून दीड फुटांवर उचलण्यात आले.
# रात्री पवना धरणाचे सहा दरवाजे तीन फुटांनी उचलले. पाण्याच्या विसर्गात वाढ.
# पवना नदीवर असलेल्या सर्वात मोठ्या काळे-ब्राह्मणोली पुलावर पाणी आले.
# सांगवीतील 50 झोपड्यांमध्ये रविवारी पहाटे पाणी आले.
# आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्रसेन नगर, पवना नगर भागात सतर्कतेचा इशारा
# वाल्हेकरवाडी येथे नदीपात्रातील झोपडपट्टी पवना नदीच्या पाण्यात
# वेताळनगर मधील एका उद्यानातून एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाची पाण्यातून अग्निशमन दलाकडून सुटका
# सांगवी परिसरातील 40 कुटुंबांचे स्थलांतर
# शांतीनगर भागातील 250 कुटुंबांचे स्थलांतर
# इंदिरानगर भागातील 200 कुटुंबांचे स्थलांतर
# भाटनगर भागातील 75 कुटुंबांचे स्थलांतर
# 150 नागरिकांचे त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर
# सांगवी मधील मधुबन सोसायटी भागातून 15 परदेशी नागरिक, एक गर्भवती महिला आणि एक स्पेशल मुलीची आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून सुटका
# मधुबन सोसायटी येथून एका बैलाची सुटका
# रविवारी (दि. 4) दुपारी 12 नंतर पवना धरणातून पवना नदीत 18 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार. हे पाणी दुपारी तीनच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात येणार असल्याने शहरातील बहुतांश भागात अतिदक्षतेचा इशारा
# कासारवाडी, दापोडी येथे नदीपात्रालगत पाणी वाढले

  • मुळशी धरणातून मुळा नदीत विसर्ग – सांगवी परिसरात हाय अलर्ट
    # मुळशी धरण 100 टक्के भरले
    # शनिवारी (दि. 3) रात्री दहा वाजता 28 हजार क्युसेक विसर्ग मुळा नदीत करण्यात आला
    # रात्री अकरा वाजता हा विसर्ग दोन हजारांनी वाढवून 30 हजार क्युसेक करण्यात आला
    # रविवारी (दि. 4) पहाटे दोन वाजता हा विसर्ग दहा हजारांनी वाढवून 40 हजार करण्यात आला
    # मुळा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा
    # रविवारी पहाटे सांगवी मधील मधुबन सोसायटी क्रमांक एक ते दहा मध्ये पाणी शिरले
    # मुळा नदीला आलेल्या पुरामुळे वाकड येथे दशक्रिया विधी घाटावर पत्र्याच्या शेडवर दोघे अडकले. अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका करण्यात आली.
    # मुळा नदीला आलेल्या पुराचे पाणी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर असलेल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये घुसले
    # रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णालयात प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
    # रुग्णालय प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन विभाग आणि नागरिकांच्या मदतीने 50 रुग्ण आणि रुग्णालयातील 120 कर्मचा-यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
    # पुणे-माणगाव मार्गावरील माले गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आले. हा मार्ग तहसीलदारांच्या आदेशाने पौड येथून वाहतुकीसाठी बंद
    # ताम्हिणीकडून माणगावकडे येणा-या प्रवासी नागरिकांना, वाहनांना योग्य त्या ठिकाणी थांबवण्याच्या मुळशी तहसीलदारांच्या सूचना

खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग
# खडकवासला धरणातून रविवारी (दि. 4) सकाळी अकरा पासून मुठा नदीत 35 हजार 574 क्युसेक पाण्याचा विसर्ग
# पानशेत धरण 100 टक्के भरले. धरणातून 12 हजार 936 क्युसेक पाण्याचा विसर्ग
# परसगाव धरण 100 टक्के भरले. धरणातून 9 हजार 35 क्युसेक पाण्याचा विसर्ग
# पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत दुपारी तीन वाजता 41 हजार 756 क्युसेक पाण्याचा विसर्ग
# शहरात झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आदर्शनगर, बोपोडी मधून 260 कुटुंबांचे राजेंद्र प्रसाद शाळेत स्थलांतर
# शांतीनगर येरवडा भागातील 300 कुटुंबांचे नानासाहेब परुळेकर शाळेत स्थलांतर
# कामगार पुतळा येथून 13 नागरिकांचे दहा नंबर शाळेत स्थलांतर
# पाटील इस्टेट मधून पाच कुटुंबांचे घोले रस्त्यावरील पीएमसी कॉलनी शाळेत स्थलांतर
# खिलारे वस्ती भागातील 50 कुटुंबांचे उपाध्याय शाळेत स्थलांतर
# मुठा नदीच्या किनारी असलेल्या एकतानगरी, द्वारकानगरी येथील रहिवाशांना धोक्याची सूचना. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

  • लोणावळा टाटा कंपनी धरण फुल्ल – इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
    # शनिवारी (दि. 3) लोणावळा परिसरात 384 मिलीमीटर पावसाची नोंद
    # रविवारी (दि. 4) पहाटे साडेपाचच्या सुमारास लोणावळा येथील टाटा कंपनी धरण ओव्हरफ्लो झाले
    # सांडव्यातून दोन क्युसेक पाणी इंद्रायणी नदीत वाहू लागले
    # इंद्रायणी नदीलगत असलेल्या भागात पुराचे पाणी घुसणार असल्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आली
    # खबरदारी म्हणून लोणावळा मधील हुडको कॉलनी आणि इंद्रायणीनगर भागात रोप बांधण्यात आले
    # लोणावळा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग, टाटा कंपनी पथक, शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी यांची पथके हुडको कॉलनी परिसरात तैनात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.