Pune : किड्समंचच्या फॅशन शोमध्ये बच्चे कंपनी थिरकणार रॅम्पवर​

एमपीसी न्यूज- मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच लहानपणीच ‘स्टेज फीयर’ नाहीसे होऊन व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरता यावे या उद्देशाने किड्समंचच्या वतीने मुलांसाठी औंध येथील वेस्टेंड मॉल येथे शनिवारी (दि. 15) किड्स फॅशन शो होणार असून या मधे वय वर्षे अडीच ते नऊ अशा विविध वयोगटातील तब्बल 65 मुले मुली देशी विदेशी पेहेरावात रॅम्पवॉक करणार आहेत. अशी माहिती सत्यजित जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेली 15 वर्षे फॅशन जगतात दिग्दर्शनासाठी सुपरिचित असलेले सत्यजित जोगळेकर यांच्या संकल्पनेतून किड्समंचची स्थापना झाली. मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच लहानपणीच ‘स्टेज फीयर’ नाहीसे होऊन व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरता यावे या उद्देशाने किड्समंचच्या वतीने मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

योगजा कुलकर्णी यांनी मुलांसाठी विविध प्रकारच्या पोषाखांची जबाबदारी स्वीकारली आहे. वैदेही पर्वतीकर जोगळेकर, सोनल नायर, नेहा कुडाळकर आणि प्रतीक्षा देशमुख या गेली दोन महिने मुलांकडून रॅम्पवॉक चा सराव करुन घेत आहेत तसेच पेहेराव स्टेज वर कसा ‘कॅरी’ करायचा याचे प्रशिक्षण देत असून आता ही बच्चे कंपनी रॅम्पवर​ थिरकण्यास सज्ज झाली आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी पहावयास खुला असून विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.