Pune : भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी व वारजे वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंगबाबत अंतिम आदेश

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वाहतूक (Pune) सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने यापूर्वी भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी व वारजे वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग 48 च्या स्वामीनारायण मंदिरासमोर ओव्हर ब्रिज ते दरी पुलाकडे जाणाऱ्या पूर्वेकडील सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूस 400 मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

चतु:श्रृंगी वाहतूक (Pune) विभागांतर्गत चौंधे पार्क समोरील वास्तु सुंदर सहकारी गृहरचना प्रवेशद्वार क्र. 1 च्या डाव्या व उजव्या बाजूस तसेच एन्क्लेव बिल्डिंग समोरील प्रवेशद्वार क्र. 2 च्या डाव्या व उजव्या बाजूस 10 मीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे. वारजे वाहतूक विभागांतर्गत कृष्णाई प्लाझा कॅनॉल रस्ता कर्वेनगर लगतचे एमएसईबी ट्रान्सफॉर्मर स्टेशन, केळकर उपहारगृह ते आरोग्य कोठी समोरील बसवेश्वर टी हाऊस या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना 100 मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

Pune : 41व्या वरिष्ठ व 25व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश संघाला विजेतेपद

हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.