Chikhali : गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक व साठवणुकीवर मोठी कारवाई

एमपीसी न्यूज – अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने(Chikhali) मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी (दि. 31) छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत 35 लाख 73 हजार 545 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

या कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे (Chikhali)गॅस भरलेले 105 सिलेंडर व रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यास ताब्यात घेण्यात आले आहे. कात्रे याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Chinchwad : सांगड एकांकिकेची कोहिनूर राज्यस्तरीय करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड

कात्रे याने अवैधपणे गॅस सिलेंडरची वाहतूक आणि साठवणूक केली याबाबत माहिती मिळाल्यानंतर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.