Pune : वेफर्स बनवणाऱ्या कारखान्याला आग; चार लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – कढईतील उकळत्या तेलाने पेट घेतल्यामुळे वेफर्स व बॉबी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर येथे सोमवारी (दि 28) रात्री घडली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर येथे असलेल्या वेफर्स व बॉबी तयार करण्याच्या कारखान्याला तेलाने पेट घेतल्यामुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये साधारण चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कात्रज व कोंढवा येथील आग्निशमन गाडयांच्या मदतीने अवघ्या दहा मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नेहमीप्रमाणे कामगार तेलामधे वेफर्स तळण्याचे काम करत होते. यावेळी अचानक कढईत उकळत्या तेलाने पेट घेतला. काही कालावधीच्या आतमधेच आगीने मोठा पेट घेतला. त्याच्यामधे कारखान्यासह इतर वस्तू जळून खाक झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.