Pune : भीषण आगीमध्ये सोफासेट बनवणारे दुकान भस्मसात

एमपीसी न्यूज- सोफासेट तयार करणाऱ्या दुकानाला आज, गुरुवारी पहाटे भीषण आग लागून दुकान पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना आज पहाटे पावणेपाचच्या दरम्यान भवानी पेठेतील चांभार आळी येथे घडली. या आगीमध्ये दुकानासमोर उभ्या करण्यात आलेल्या तीन दुचाकी भस्मसात झाल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

पुणे अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान भवानी पेठेतील चांभार आळी येथे एका सोफासेट बनवणाऱ्या दुकानाला आग लागल्याची वर्दी मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब आणि एक पाण्याचा टँकर रवाना झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीमध्ये दुकानासमोर उभ्या करण्यात आलेल्या तीन दुचाक्या जाळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.