Pune : पुण्यात जबरी चोरी; चोरटयांनी 32 लाखांचा मुद्देमाल पळवला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune) हद्दीतील भोसले नगरमध्ये जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरांनी एका बंगल्यातून तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय 52, रेंज हिल रोड, भोसले नगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : मंगळवारपर्यंत बी. टी. कवडे रस्त्यावरील वाहतुकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या किचनच्या खिडकीचे स्लाइडिंग अज्ञात व्यक्तीने उखडून घरात प्रवेश केला. (Pune) त्यानंतर आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मधील वॉर्डरोब उचकटून त्यामधील दोन लॉकर व त्यामध्ये असलेले 32 लाख 50 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, डायमंड चोरून नेले आहेत. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.