Ganeshotsav Competition: राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळ प्रथम 

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019 मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. (Ganeshotsav Competition) या स्पर्धेत सहभागी झालेल्या 162 मंडळांपैकी 112 मंडळांनी पारितोषिक मिळविली असून एकूण 15 लाख 9 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी ट्रस्ट चे  डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण,  राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे.

 

या स्पर्धेत, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.(Ganeshotsav Competition) तर यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला देण्यात येणार आहे. रुपये एक लाख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Maharashtra Political Crises: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, 22 ऑगस्टला सुनावणी होणार

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या प्लास्टिक खेळण्यापासून श्री मूर्ती या देखाव्याला 51 हजार रुपयांचे, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक सजावट या देखाव्यास 45 हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या गाझी पाणबुडी हल्ला या देखाव्यास 40 हजारांचे,(Ganeshotsav Competition) काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या नदी जोड प्रकल्प या देखाव्याला 35 हजारांचे आणि महाराष्ट्र तरुण मंडळाच्या तुमच्यातला एक मी या देखाव्याला 30 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.