Pune : मी नायक आहे, हेच माझ्यासाठी चांगले -अनिल कपूर

एमपीसी न्यूज – सध्याच्या राजकारणावर अभिनेता अनिल कपूर यांनी आपली भूमिका मांडली असून मी नायक आहे हेच माझ्यासाठी चांगले आहे. मला पुण्यात राहायला आवडेल. अशी इच्छाही देखील अनिल कपूरने व्यक्त केली.

पुण्यात ‘मलबार हिल’ या दुकानाचे उदघाटन अभिनेता अनिल कपूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पुणेकरांसोबत गाण्यावर ठेका धरुन पुणेकरांना खूश केले. त्यानतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एक दिवसाचा मुख्यमंत्रीबाबत मला अनेकांनी विचारले पण, मी नायक आहे हे माझ्यासाठी चांगले आहे. आणि शेवटपर्यत ‘नायक’च राहणार असेही अनिल कपूरने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.