Bhosari : फोन न उचलल्यावरून पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीचा फोन न उचलल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केली. याबाबत पत्नीने पती विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार 18 ऑक्टोबर रोजी रामनगर हाउसिंग सोसायटी, भोसरी येथे घडला.

अक्षया गणेश जगताप (वय 30, रा. हाउसिंग सोसायटी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश दत्तात्रय जगताप (रा. च-होली खुर्द) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षया त्यांच्या माहेरी राहतात. आरोपी पती गणेश याने अक्षया यांना फोन केला. हा फोन अक्षया यांनी उचलला नाही. या कारणावरून गणेश याने अक्षयाच्या माहेरी जाऊन ‘तू माझा फोन का उचलला नाहीस?’ असे म्हणत, तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.