Pune Graduate Constituency Voting : पुणे पदवीधर मतदार संघात दुपारी बारा पर्यंत 19.44 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात (दहा ते बारा) 10.92 टक्के मतदान झाले. चार तासात एकूण 19.44 टक्के मतदान झाले आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 371 पुरुष तर 1 लाख 34 हजार 854 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 32 तृतीयपंथी पदवीधर मतदार आहेत. यातील 62 हजार 95 पुरुष तर 20 हजार 782 महिला मतदारांनी पहिल्या चार तासात (दुपारी बारा वाजेपर्यंत) मतदान केले आहे. एकूण 4 लाख 28 हजार 257 पदवीधर मतदारांपैकी 82 हजार 877 पदवीधर मतदारांनी बारा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 19.44 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान –

पुणे (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 89626 – 8788
महिला – 46958 – 5965
तृतीयपंथी – 27 – 0
एकूण – 136611 – 14753 (10.80 टक्के)

सातारा (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 39397 – 9316
महिला – 19673 – 2632
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 59071 – 11948 (20.23 टक्के)

सांगली (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 57569 – 14636
महिला – 29661 – 4997
तृतीयपंथी – 3 – 0
एकूण – 87233 – 19633 (22.51 टक्के)

सोलापूर (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 42070 – 9473
महिला – 11742 – 1679
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 53813 – 11152 (20.72 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 62709 – 19882
महिला – 26820 – 5509
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 89529 – 25391 (28.36 टक्के)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.