Gunjawani Dam: गुंजवणी धरणातून 200 क्युसेक विसर्ग सुरु होणार, नागरिकांना खबरदारीचे आवाहन

एमपीसी न्यूज : पुणे व आसपासच्या परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातही चांगलाच पाउस बरसत आहे. (Gunjawani Dam) परिणामी गुंजवणी धरणातून 200 क्युसेक विसर्ग सुरु होणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे दि.म डुबल, कार्यकारी अभियंता, निरा देवघर प्रकल्प यांनी सांगितले आहे.

गुंजवणी धरण जलाशय पातळी वाढत असून विद्युतगृहातून 200 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. पावसाच्या तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी किंवा जास्त होईल.(Gunjawani Dam) नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन दि.म.डुबल, कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Pimpri News : ‘एसटीपी’ सुरु न ठेवणा-या हौसिंग सोसायट्यांना दंड

गुंजवणी जलायशयातील विसर्ग केलेले पाणी गुंजवणी नदीत जाते. गुंजवणी नदी वेल्हे व भोर तालुक्यातून वाहत जाते. त्यामुळे गुंजवणी नदीकाठच्या या तालुक्यातील गावांनी खबरदारी घ्यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.