Pune : गुरुनानक जयंतीनिमित्त पाकिस्तान येथून निघालेली यात्रा पुण्यात

एमपीसी न्यूज- शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानातील नंनकांना साहेब या त्यांच्या जन्मस्थानावरून निघालेली यात्रा शुक्रवारी रात्री पुण्यात पोहोचली. या यात्रेतील रथामध्ये गुरुनानक देवजी यांनी वापरलेले शस्त्र आणि गुरूग्रंथ साहेबजी, खडाव आणि इतर साहित्य आहे.

नांदेड येथील गुरुद्वाराहुन औरंगाबाद मार्गे ही यात्रा शुक्रवारी पुण्यात मुक्कामी पोहोचली. या वेळी पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यातील तरुणांनी दुचाकी रॅली काढून या यात्रेत सहभाग घेतला. पुण्यातील कॅम्प भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे या यात्रेने मुक्काम केला. आज सकाळी ही यात्रा आपल्या पुढील प्रवासास निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.