Pune : कोथरूडमध्ये दीपक मानकरांकडून शेकडो नागरिकांना अन्नदान

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांच्यावतीने कोथरूडमध्ये शेकडो नागरिकांना अन्नदान करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत.

कोरोना या महाभयंकर विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. बघता बघता हे संकट आपल्या भारतातही पोहचले आहे. या रोगामुळे कष्टकऱ्यांचे एक वेळचे पोट भरणे सुद्धा अवघड आहे. प्रभाग क्र ११ मधील प्रामुख्याने केळेवाडी, हनुमाननगर, राउतवाडी, किष्किंधानंदानगर, जयभवानीनगर, मातोबानगर, सुतरदारा या ठिकाणी बरेच गोरगरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करत होते. पण, सध्याच्या परिस्थितीने पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेने भयभीत व व्याकूळ झाले आहेत.

अशा दयनीय परिस्थित आशेचा किरण व मायेचा ओलावा दीपक मानकर यांनी दिला आहे. मानकर यांनी या भागातील शेकडो गरीब नागरिकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.