Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठान तर्फे पुण्यात मुकपद यात्रेचे आयोजन; शिवभक्तांनी वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे (Pune) आज पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या 334 व्या पुण्यतिथी निमित्त मुकपद यात्रा काढण्यात आली. सकाळी 7 वाजता या मुकपद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 500 हून अधिक शिवभक्तांनी सहभाग घेतला. 

या मुकपद यात्रेला कसबा गणपती मंदिरापासून सुरूवात झाली. त्यानंतर आप्पा बळवंत चौक, अलका टॉकीज चौक मार्गे डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या यात्रेचा समारोप करण्यात आला. या मुकपद यात्रेसाठी वढू येथून संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून पायी धावत येत धर्मवीर ज्वाला देखील आणण्यात आली होती.

pfbid0288NTtGdpePvMb2kRzRhU5HemNPTMb7Qa9Kj1b1EnUy5PWYe2KN4oFFEVL28zXEoil

 

छत्रपती श्री संभाजी महाराज यांना फाल्गुन प्रतिपदेला औरंगजेबाने कैद करून फाल्गुन अमावस्येपर्यंत हाल हाल करून मारले. आजच्या दिवशी त्यांनी (Pune) आपला प्राण सोडला. त्यांची अंत्ययात्रा निघू शकली नाही. त्यामुळे शिवप्रतिष्ठान ही संस्था गेले 38 वर्षी धर्मवीर बलिदान मास हा उपक्रम राबवते. यामध्ये एक महिना सूतक पाळले जाते. तर आजच्या दिवशी त्यांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.