Pune News : ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ विषयावर 26 मार्च रोजी व्याख्यान आयोजित

एमपीसी न्यूज – ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’या संस्थेच्या पुणे शाखेकडून ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ या विषयावर वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.(Pune News) रविवार,26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सावरकर स्मारक सभागृह(कर्वे रस्ता,डेक्कन) येथे हे व्याख्यान होणार आहे. वक्त्या माधवी जोशी हे व्याख्यान देणार आहेत.

 

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’या संस्थेच्या पुणे शाखेचे प्रमुख जयंत कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘भारतीय संस्कृती’ मधील ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमातील ‘गृहस्थाश्रम’ महत्त्वाचा आहे , कारण तो इतर तीनही आश्रमांचा आधार आहे. याबद्दलच अधिक जाणून घेण्यासाठी खासकरून जे गृहस्थाश्रम स्वीकारणार आहेत अशा तरुणांनी व्याख्यानाला जरूर यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Shirgaon : दारु निर्मिती प्रकरणी चार महिलांवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन जप्त

 

वसुंधराताई सातवळेकर यांनी पत्राद्वारे दासबोधाच्या सर्व परीक्षा पूर्ण करुन त्यांनी दासबोधाचा नुसता अभ्यासच नव्हे तर दासबोध प्रत्यक्ष जीवनात उतरवलेला होता. (Pune News) समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद हे दोघे योद्धे सन्यासी त्यांचे आदर्श होते. त्यांच्या कार्याचा, उपदेशाचा जीवनात कसा उपयोग करायचा हे वसुंधराताईंनी अनेक मार्गांनी शिकवले.

 

वसुंधराताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पती भालचंद्र सातवळेकर यांच्या सहकार्याने विवेकानंद केंद्र पुणे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यान आयोजित करते आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.