Shirgaon : दारु निर्मिती प्रकरणी चार महिलांवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज –  शिरगाव येथे पवना नदीच्या कडेला कंजारभाट वस्तीजवळ चार महिला दारू निर्मितीचे बेकायदेशीर काम करत होत्या. (Shirgaon) त्या ठिकाणी छापा टाकत शिरगाव परंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई सोमवारी (दि.20) दुपारी करण्यात आली.

 

याप्रकऱणी चार महिलांविरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

 

Cricket News : जसप्रीत बुमराहची गोलंदाजीची पद्धत शाश्वत नाही – शोएब अख्तर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवाडी येथील कांजारभाट वस्ती जवळ आरोपी महिला या दारु तयार कऱण्या करीता 4 लाख 81 हजार रुपयांचे गुळ बाधित कच्चे रसायन (Shirgaon) एका खड्ड्यामध्ये व लोखंडी पात्रात भिजत घातले होते. पोलिसांनी छापा टाकून त्या रसायनाची व्लिहेवाट लावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.