Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे तरुणाची दगडाने ठेचून हत्या

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून (Vadgaon Maval) तिघांनी एका 21 वर्षीय तरुणाचे अपहरण करून दगडाने ठेचून खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.20) मध्यरात्री ब्राम्हणवाडी येथील खापरे ओढ्या शेजारी घडली आहे.

 

सौरभ शैलेंद्र मसेकर (वय 21 रा.जाभूंळ) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी सक्षम शंकर आनंदे (वय 18 रा.जांभूळ) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पोलीस ठाण्यात मयताचा मित्र अभिषेक रमाकांत जेवळीकर (वय 22, रा.जांभूळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सौरभ व आरोपी यांच्यात भाडण झाले होते. यावेळी सौरभ याने सक्षमच्या पाठीवर कटर मारून त्याला जखमी केले होते. याच रागातून सक्षम याने त्याच्या (Vadgaon Maval) साथीदारांसह येत फिर्यादीची गाडी अडवली व सौरभ याला जबरदस्ती सोबत नेले.

Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठान तर्फे पुण्यात मुकपद यात्रेचे आयोजन; शिवभक्तांनी वाहिली श्रद्धांजली

ब्राम्हणे वस्ती खापरे ओढ्याजवळ नेऊन मारहाण केली. तसेच, डोक्यात दगड मारून सौरभ याचा खून केला. वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.