Pune News : ओशो आश्रम वाचवण्यासाठी शिष्यांनी केलेल्या आंदोलनाला यश

एमपीसी न्यूज़ –  रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी मंगळवारी आश्रमात संन्यासी माळ घालून प्रवेश नाकारल्या बद्दल  व ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे न करणे, तसेच आश्रमाची जागा विक्रीला काढून ओशो (Pune News) विचार संपवण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन निदर्शनेही केली.  शिष्यांची एकजुट पाहून आश्रम व्यवस्थापन नमले असून  त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे.

 

शिष्यांची संख्या बघून आश्रम व्यवस्थापानाने सर्व ओशो प्रेमींना आत सोडले. ह्याच वेळी स्वामी चैतन्य कीर्ती ह्यानी शिष्यांना संभोधित करताना म्हणाले की, आज आपल्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे पण ह्या पुढे देखील आपण हा लढा कायम ठेवायचं आहे तसेच आश्रम व ओशोचे विचार कायम ठेवायचे आहेत.

 

 

Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठान तर्फे पुण्यात मुकपद यात्रेचे आयोजन; शिवभक्तांनी वाहिली श्रद्धांजली

 

पोलिसांनी मध्यस्ती केल्या मुळे आज सर्व ओशो प्रेमींना आत प्रवेश दिला. तेव्हाच आश्रमाच्या आतील एकूण स्थिती बघून तसेच  स्विमिंगपूल, मुख्य समाधी व ध्यान केंद्राची अवस्था पाहून (Pune News) सर्व शिष्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण   आश्रमाचे वैभव त्याला पुन्हा परत करुन देऊ असा निश्चय देखील यावेळी करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.